Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम सह लॉन्च

टाइम्स मराठी । स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi भारतात वेगवेगळ्या सिरीज मध्ये स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता Xiaomi ने फ्लॅगशीप स्मार्टफोन सिरीज Xiaomi 14 सिरीज मध्ये दोन नवीन मोबाईल ऍड केले आहेत. त्यानुसार कंपनीने Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोनमध्ये पावरफुल प्रोसेसर आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम चा वापर करण्यात आला आहे. सध्या तरी कंपनीने या सिरीजचे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केले आहे. परंतु लवकरच हाच मोबाईल भारतात सुद्धा लॉन्च होऊ शकतो. आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

Xiaomi 14 स्पेसिफिकेशन 

Xiaomi 14 याच स्मार्टफोन मध्ये 6.36 इंच 1.5 क OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 3000 निट्स ब्राईटनेस आणि 120hz रिफ्रेश रेटसह सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 4nm स्नॅपड्रॅगन  8 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट HyperOS सिस्टीम वापरली आहे. यामध्ये बॅकअप साठी 4610 mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 50 W वायरलेस चार्जिंगला आणि 90W वायर्ड ला चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi 14 pro स्पेसिफिकेशन

Xiaomi 14 Pro यामध्ये 6.73 इंच चा  K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले  120hz रिफ्रेश रेट आणि 12 बिटने सुसज्ज आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध केले असून हा मोबाईल नवीन HyperOS ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो. या स्मार्टफोन मध्ये 16 GB रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.

Xiaomi 14 कॅमेरा

Xiaomi 14 या मोबाईलच्या कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये OIS सपोर्ट सह 50 MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. यासोबतच 50 MP सेकंडरी आणि 50 MP टेलीफोटो कॅमेरा लेन्स यात देण्यात आली आहे. याशिवाय सेल्फी साठी यामध्ये 32 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi 14 Pro कॅमेरा

Xiaomi 14 pro मध्ये  50 MP प्रायमरी कॅमेरा, 50 MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा  आणि 50 MP टेलीफोटो कॅमेरा लेन्स यात देण्यात आले आहे. यासोबतच सेल्फी साठी यामध्ये 32 MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईल मध्ये कंपनीने 4880mAh बॅटरी  उपलब्ध केली आहे. ही बॅटरी 120 W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro किंमत

Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro या दोन्ही स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, Xiaomi 14 या स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट ची किंमत 3,999 CNY म्हणजे 45000 रुपये एवढी आहे. आणि Xiaomi 14 pro या स्मार्टफोनच्या 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज मोबाईलची किंमत 4999 CNY म्हणजे 56,500 रुपये आहे.