Xiaomi 14 Civi : नाद खुळा!! 2-2 सेल्फी कॅमेरासह लाँच होणार हा मोबाईल

टाइम्स मराठी । सध्याचे जग हे टेक्नॉलॉजीचे जग असून दररोज आपल्याला नवनवीन काहीतरी बघायला मिळते. मोबाईल क्षेत्रातही हा बदल पाहायला मिळत असून अपडेटेड फीचर्ससह चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन बाजारात येत असतात. आत्तापर्यंत तुम्ही मोबाईलच्या पाठीमागील बाजूला ३ कॅमेरे आणि समोर १ सेल्फी कॅमेरा असलेला बघितलं असेल, पण आता बाजारात असा एक नवीन मोबाईल लाँच होणार आहे ज्यामध्ये समोरील बाजूला 2-2 सेल्फी कॅमेरा असणार आहे. Xiaomi 14 Civi असे या मोबाईलचे नाव आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

6.55 इंचाचा डिस्प्ले –

Xiaomi 14 Civi मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.55 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा डिस्प्ले 3,000 nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन सह लाँच करण्यात येईल. कंपनी या मोबाईल मध्ये Xiaomi Qualcomm 4nm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट बसवेल. तसेच हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Xiaomi HyperOS ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. मोबाईल मध्ये 16GB रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेज देण्यात येईल, त्यामुळे गेमिंग साठीही हा स्मार्टफोन बेस्ट पर्याय ठरेल.

कॅमेरा – Xiaomi 14 Civi

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Xiaomi 14 Civi मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP चा पोर्ट्रेट कॅमेराचा समावेश आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32MP+32MP चे दोन फ्रंट कॅमरा आहेत. त्यामुळे तुम्ही या स्मार्टफोनच्या माध्यमातून आरामात अतिशय चांगल्या दर्जाचे फोटो काढू शकता. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 4,700mAh बॅटरी देण्यात येईल. हि बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

स्टोरेज आणि ओएस: स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन फोन 16GB रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेज मिळवू शकतो. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Xiaomi HyperOS ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.