Xiaomi Electric Car : Xiaomi ने लाँच केली Electric Car; देते 800 KM पर्यंत रेंज

Xiaomi Electric Car । सध्या बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मोठी चलती आहे. पेट्रोल – डिझेल पासून सुटका करण्यासाठी अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपली पसंती देत आहेत. त्यामुळे वाढत्या मागणीमुळे सर्वच वाहन निर्माता कंपन्या आपली गाडी इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत. त्यात आता चीनी मोबाईल निर्माता कंपनी स्मार्टफोन Xiaomi सुद्धा मागे नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण Xiaomi बाजारात इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. Xiaomi SU7 आणि SU7 Max असे या कारचे नाव आहे. एवढच नव्हे तर आम्हाला जगातील टॉप 5 ऑटोमेकर बनायचे आहे असा इरादाही कंपनीने बोलून दाखवला आहे. आज आपण जाणून घेऊयात या इलेक्ट्रिक कारचे खास फीचर्स

   

Xiaomi ची ही पहिली इलेक्ट्रिक कार HyperOS सह येते. कंपनीने या इलेक्ट्रिक कारच्या )Xiaomi Electric Car) इंटीरियरवर खूप मेहनत घेतली आहे. या कारची डिझाईन अतिशय स्पोर्टी आणि स्टायलिश आहे त्यामुळे बघता क्षणीच ही कार तुमच्या मनात भरेल. Xiaomi च्या या इलेक्ट्रिक कारची लांबी 4997 मिमी, रुंदी 1963 मिमी आणि उंची 455 मिमी आहे. या कारला 3000 मिमीचा व्हीलबेस देण्यात आलाय.

800 किलोमीटर रेंज – Xiaomi Electric Car

कंपनीने आपल्या या पहिल्यावाहिल्या इलेक्ट्रिक कार मध्ये 2 बॅटरी दिले आहेत. यातील बेस व्हेरिएंट मध्ये 73.6 kWh चा बॅटरी पॅक आहे आणि टॉप व्हेरिएंट मध्ये 101 kWh चा बॅटरी पॅक बसवण्यात आलाय. गाडीच्या टॉप स्पीड बाबत सांगायचं झाल्यास, बेस व्हेरिएंट कार 210 किमी प्रतितासचा टॉप स्पीड देते तर दुसरीकडे टॉप व्हेरिएंटला ल 265 किमी प्रतितास इतकं टॉप स्पीड मिळतंय. कंपनीचा दावा आहे कि टॉप व्हेरिएंट मॉडेल एकदा फुल्ल चार्ज केलं कि 800 किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करेल.

Xiaomi चे चीफ एग्जीक्यूटिव Lei Jun यांनी सांगितलं कि, ही इलेक्ट्रिक कार (Xiaomi Electric Car) खरेदी करण्यासाठी आम्ही जवळपास 15 ते 20 वर्षे काम करत होतो. आम्हाला जगातील टॉप 5 ऑटोमेकर बनायचं आहे. कंपनी ऑटोमध्‍ये 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. आणि इतर कंपन्यांप्रमाणे Xiaomi सुद्धा आगामी काळात नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणेल.