Xiaomi Electric Car : Xiaomi लवकरच लॉन्च करणार नवीन Electric Car; मिळणार जबरदस्त फीचर्स

टाइम्स मराठी । इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट लॉन्च करणारी कंपनी आणि स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाणारी Xiaomi लवकरच ऑटोमोबाईल वाहन निर्माता क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहे. कंपनीकडून आता इलेक्ट्रिक कार (Xiaomi Electric Car) बनवण्यात येणार आहे. यासाठी कंपनीने चिनी सरकारला आवेदन देखील दिले आहे.  Xiaomi कंपनी भारतीय बाजारपेठेमध्ये स्मार्टवॉच, स्मार्टटीव्ही, स्मार्टफोन, यासारखे बरेच इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट बनवत असते. आता Xiaomi डेव्हलप करणारी इलेक्ट्रिक कार कशी असेल आणि ही इलेक्ट्रिक कार लोकांच्या किती प्रमाणात पसंतीस उतरेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

   

Xiaomi कंपनी लॉन्च करणार असणारी इलेक्ट्रिक कार (Xiaomi Electric Car) ही लक्झरी कार असेल. कंपनीकडून या कार मध्ये तीन व्हेरियंट लॉन्च करण्यात येणार आहे. SU7, SU7 PRO, SU7 MAX असं या तिन्ही व्हेरिएंटचे नाव असेल. ही कार बाकीच्या कार निर्माता कंपन्या BYD SEAL आणि BMW I4 या गाडयांना जोरदार टक्कर देईल. या इलेक्ट्रिक कार मध्ये 19 आणि 20 इंचाचे टायर देण्यात येणार आहे.

फिचर्स- Xiaomi Electric Car

Xiaomi SU7 या लक्झरी कार मध्ये टच स्क्रीन सिस्टीम, डिजिटल डिस्प्ले  यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देण्यात येतील. एवढेच नाही तर सिक्युरिटी साठी कार मध्ये एअर बॅग प्रमाणे बरेच फीचर्स मिळतील. शाओमी कंपनीच्या या लक्झरी कार मध्ये रियर व्हील ड्राईव्ह आणि  4 व्हील ड्राईव्ह दोन्ही ऑप्शन मिळतील. यासोबतच कारमध्ये (Xiaomi Electric Car) ड्युअल मोटर देखील देण्यात येणार आहे. या मोटरच्या माध्यमातून हाय स्पीड आणि पावर मिळू शकेल. ही नवीन जनरेशन कार असण्याची शक्यता आहे.

पावरट्रेन

Xiaomi च्या या अपकमिंग कारमध्ये  495 kw आणि 220 kw पावरट्रेन देखील देण्यात येऊ शकते. ही कार ग्लोबल मार्केट नंतर भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. XIAOMI SU7 या लक्झरी कारच्या व्हेरिएंटमध्ये 210 किलोमीटर प्रति तास आणि 265 किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड मिळेल. ही कार काही सेकंदामध्ये 100 किलोमीटर प्रति तास रेंज पकडेल. एवढेच नाही तर ही कार खराब रस्त्यांवर सुरक्षितरित्या ड्राईव्ह करता येऊ शकते.

इंटिरियर

XIAOMI SU7 या कारमध्ये  कंपनीकडून LED लाईट्स, क्रूज कंट्रोल, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, अलॉय व्हील  देण्यात येणार आहे. या कारच्या इंटरियर मध्ये लक्झरी फील मिळेल. यासोबतच आरामदायक सीट आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील मिळेल. ही कार सिंगल चार्ज वर जास्त रेंज देईल.