Xiaomi चा धमाका!! Mix Fold 3 सह Band 8 Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी Xiaomi ने आपल्या यूजर्ससाठी २ नवीन डिव्हाइस Xiaomi Mix Fold 3 आणि Xiaomi Band 8 Pro चीनमध्ये लाँच केले आहेत. यातील Xiaomi मिक्स फोल्ड 3 हा कंपनीचा तिसरा मोबाइल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल प्रेमी या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत होते. या मोबाईल सोबत कंपनीने Xiaomi Band 8 Pro सुद्धा बाजारात आणला आहे. आज आपण या दोन्ही वस्तूंचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

   

Xiaomi Mix Fold 3 चे फीचर्स –

Xiaomi Mix Fold 3 स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा AMOLED आऊटर डिस्प्ले आणि 8.25-इंच मुख्य स्क्रीन आहे. दोन्ही डिस्प्ले सॅमसंगच्या E6 पॅनल आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. Xiaomi Mix Fold 3 मध्ये Qulacomm च्या Snapdragon 8 Gen 2 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. या मोबाईल ला 4,800mAh बॅटरी असून ही बॅटरी 67W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 13-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 10-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि 10-मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्सचा समावेश आहे. याशिवाय सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला कव्हर स्क्रीनमध्ये 20-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत –

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Xiaomi Mix Fold 3 च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत CNY 8,999 म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 1.03 लाख रुपये एवढी आहे. तर 16GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत CNY 9,999 म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 1,14,500 रुपये इतकी आहे.

Xiaomi Band 8 Pro-

दुसरीकडे Xiaomi ने आपला Band 8 Pro सुद्धा लाँच केला आहे. या स्मार्टबॅंड मध्ये अपडेटेड फीचर्स सह 60Hz रिफ्रेश रेट, 336ppi पिक्सेल डेन्सिटी आणि 16.7 दशलक्ष रंगांसह 1.74-इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. या बँडची स्क्रीन 600NITs पर्यंत असून खूपच चमकदार आहे. हा बँड अतिशय स्लिम असून त्याची जाडी फक्त 9.99mm आहे. हवामान, वेळापत्रक, कॅलेंडर आणि इतर नवीन फीचर्स सह अनेक माहिती देते तसेच हे 150 हून अधिक स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करते . या बँडची बॅटरी 14 दिवसांपर्यंत टिकू शकते, परंतु AOD मोडमध्ये, ती जवळपास 6 दिवस चालेल. Xiaomi Mi Band 8 Pro २ व्हेरिएन्ट मध्ये येतो. यामधील TPU रिस्टबँड व्हेरिएन्टची किंमत 399 युआन म्हणजेच 4,570 रुपये आहे तर लेदर रिस्टबँड व्हेरिएन्टची किंमत 499 युआन म्हणजेच 5,710 रुपये ठेवण्यात आली आहे.