Xiaomi ने PAD 6 टॅबलेटच्या किमती केल्या कमी; जाणून घ्या ऑफर 

टाइम्स मराठी । Xiaomi ही कंपनी वेगवेगळ्या Smart TV , Mobile , SmartWatch , Tablet भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करत असते. सध्या Xiaomi ने  अँड्रॉइड टॅबलेट लाईनअप च्या प्राईज कमी केल्या आहेत. त्यानुसार XIAOMI PAD 6 हा टॅबलेट कंपनीने कमी किमतीमध्ये उपलब्ध केला असून ग्राहकांसाठी हा चांगला चान्स आहे. Xiaomi ने हा टॅबलेट याच वर्षी जून मध्ये लॉन्च केला होता. म्हणजेच तुम्हाला या टॅबलेट मध्ये  लेटेस्ट सॉफ्टवेअर आणि प्रोसेसर मिळेल. तुम्ही देखील हा टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर  जाणून घ्या ऑफर आणि किंमत.

   

किंमत

Xiaomi PAD 6 या टॅबलेट मध्ये कंपनीने दोन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध केले आहे. त्यापैकी 6 GB रॅम आणि 156 GB स्टोरेज असलेल्या पहिल्या व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. आणि 8 GB रॅम, 256 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे. परंतु आता तुम्ही 6 GB रॅम असलेला व्हेरीएंट 24,999 रुपयात खरेदी करू शकतात.  आणि 8 GB रॅम असलेला व्हेरिएंट 26,999 रुपयात खरेदी करू शकतात.

ऑफर

Xiaomi PAD 6 या टॅबलेट वर कंपनीने बँक ऑफर देखील उपलब्ध केली आहेत. त्यानुसार ICICI बँकेच्या  क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वरून तुम्ही टॅबलेट खरेदी करणार असाल तर तुम्हाला 3,000 रुपयांचा फ्लॅट इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. यासोबतच  HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर देखील 3000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. याशिवाय  IDFC first बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 2000 रुपयांची फ्लॅट सूट या टॅबलेट वर मिळेल.

स्पेसिफिकेशन

Xiaomi PAD 6 या टॅबलेट मध्ये  11 इंच चा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2880×800 पिक्सेल रिझोल्युशन ऑफर करतो. आणि 144 hz रिफ्रेश रेट देतो. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास 3 ने सुरक्षित करण्यात आला आहे. कंपनीने या टॅबलेट मध्ये  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन  870 चिपसेट उपलब्ध आहे.

कॅमेरा

Xiaomi PAD 6 या टॅबलेट मध्ये 13 MP सिंगल लेन्स रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा  f/2.2 अपर्चर सह उपलब्ध आहे. यासह 8  MP फ्रंट कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. या टॅबलेट मध्ये 128 GB स्टोरेज आणि 256 GB स्टोरेज मिळते. टॅबलेटमध्ये 8840 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.