Xiaomi Pad 6S Pro : 10000mAh बॅटरीसह Xiaomi ने लाँच केला नवा Tab; पहा किंमत आणि फीचर्स

Xiaomi Pad 6S Pro : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Xiaomi ने Pad 6S Pro 12.4 टॅबलेट लॉन्च केला आहे. 12.4-इंचाचा डिस्प्ले असलेल्या या टॅबलेट मध्ये कंपनीने अनेक खास आणि दमदार फीचर्सर दिले आहेत. सध्या या टॅबलेटचे लौंचिंग चीनमध्ये करण्यात आलं असून लवकरच तो भारतीय बाजारपेठेत सुद्धा दाखल होणार आहे. आज आपण Xiaomi च्या टॅबचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

   

Xiaomi Pad 6S Pro मध्ये 144Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह 12.4-इंचाचा 3k LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 900 निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण मिळतेय. टॅबलेटमध्ये Snapdragon 8 Gen 2 SoC प्रोसेसर बसवण्यात आला आहे. खास गोष्ट म्हणजे यामध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB स्टोरेज देण्यात आलं आहे. म्हणजेच तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात डेटा या टॅबलेट मध्ये ठेव शकता.

कॅमेरा – Xiaomi Pad 6S Pro

टॅबलेटमध्ये देण्यात आलेल्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Xiaomi Pad 6S Pro मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक रिअर कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आलाय. तर सेल्फी साठी समोरील बाजूला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा बसवण्यात आलाय जो होल-पंच कटआउटमध्ये सेट आहे. या टॅबलेट मध्ये कंपनीने 10000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 120W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Xiaomi Pad 6S Pro च्या 8GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 3,299 युआन (अंदाजे रु. 38,000) आहे. तर 12GB + 256GB आणि 12GB + 512GB व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 3,599 युआन (अंदाजे रु. 42,100) आणि 3,999 युआन (अंदाजे रु. 46,790) आहे. यातील टॉप व्हेरियेण्ट असलेल्या 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज मॉडेलची किंमत 4,499 युआन (अंदाजे रु 52,640) आहे. हा टॅबलेट काळ्या, निळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहे.