टाइम्स मराठी । सध्या फेस्टिवल सीजनची तयारी सर्वत्र जोरदार चालू आहे. या फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्म वर बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. दिवाळी काही दिवसांनंतर सुरू होणार आहे. या दिवाळी निमित्त Amazon आणि Flipkart या ई-कॉमर्स वेबसाईटवर सेलची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर Xiaomi कडून या फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून एक कॅम्पेन राबवण्यात येत आहे. या कॅम्पेन मध्ये नवीन फोन गॅजेट खरेदी न करता अपकमिंग सेल ची वाट पहा असं सांगण्यात आलं. हा सेल फेस्टिवल सीजन मध्ये सुरू होणार आहे.
बंपर डिस्काउंट ऑफर
Xiaomi कंपनीने या सेलला Diwali With Me असे नाव दिले आहे. त्याचबरोबर यासाठी कंपनीने मायक्रोसाईट देखील डेव्हलप केली आहे. या मायक्रोसाईटवर don’t buy Tech yet it’s worth the wait असे कॅप्शन देण्यात आले आहे. म्हणजेच जर तुम्ही अजून पर्यंत टीव्ही लॅपटॉप किंवा स्मार्टफोन खरेदी केलेला नसेल तर थोडी वाट पहा, चांगलंच होईल. हे कॅप्शन देण्यात आले. म्हणजेच आता शाओमी च्या या सेलमध्ये स्मार्टफोन टीव्ही यासारख्या गॅजेट्सवर बंपर डिस्काउंट ऑफर उपलब्ध करण्यात येणार आहे. परंतु कंपनीने किती डिस्काउंट देणार या बद्दल कोणतीच माहिती उपलब्ध केली नाही.
कस्टमाईज कुपन
वेबसाईट नुसार या सेलमध्ये कस्टमर Mobile, Laptop, tv यासारखे प्रॉडक्ट कमी किमतीमध्ये खरेदी करता येऊ शकतील. कंपनीने उपलब्ध केलेल्या मायक्रोसाईटवर गेल्यावर दिवाळी सेल या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला नोटिफाय मी हे ऑप्शन दिसेल. या ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुम्हाला कस्टमाईज कुपन देखील मिळतील. याशिवाय दिवाळी सेल साठी अर्ली इन्व्हाईट आणि बेस्ट डिस्काउंट एक्सेस देखील देण्यात येत आहे.