XWatch B2 : 2500 रुपयांपेक्षाही कमी किमतीत लाँच झालं ‘हे’ स्मार्टवॉच

टाइम्स मराठी । भारतामध्ये PROMET कंपनीने नवीन स्मार्टवॉच लॉन्च केली आहे. XWatch B2 असे या नवीन स्मार्टवॉचचे नाव आहे. कंपनीने हे नवीन स्मार्टवॉच बजेट सेगमेंट मध्ये उपलब्ध केलं असून या स्मार्टवॉचची किंमत 2500 रुपयांपेक्षाही कमी आहे. दिवाळीच्या काळात लॉन्च करण्यात आलेले हे स्मार्टवॉच तुम्ही गिफ्ट म्हणून देखील देऊ शकता. यामध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच मल्टी स्पोर्ट मोड, ऍक्टिव्ह लाईफ हेल्थ फीचर्स देण्यात आले आहे. जाणून घेऊया या स्मार्टवॉचची किंमत आणि फीचर्स.

   

स्पेसिफिकेशन

XWatch B2 या स्मार्टवॉच मध्ये कंपनीने TFT डिस्प्ले दिला आहे. हे स्मार्टवॉच  2.1 इंच  डिस्प्ले सह  240×296 पिक्सल रिझोल्युशन ऑफर करते. या वॉचचा डिस्प्ले 500 नीट्स ब्राईटनेस सह उपलब्ध आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच लाईट डिझाईन सह उपलब्ध केलं असून यामध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. स्मार्टवॉच मध्ये देण्यात आलेली बॅटरी सिंगल चार्जवर 10 ते 15 दिवसांपर्यंत चालते.

फिचर्स– XWatch B2

XWatch B2 स्मार्टवॉच मध्ये कंपनीने इझी नेव्हिगेशन साठी रोटेटिंग क्राऊन दिले आहे. यासोबतच 200 पेक्षा जास्त वॉच फेसेस यामध्ये उपलब्ध असून 123 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहे. या स्पोर्ट्स मोडमध्ये रनिंग, सायकलिंग, योगा यासारखे बरेच मोड उपलब्ध आहे. यासोबतच ऍक्टिव्ह लाईफ हेल्थ सेंसर देखील उपलब्ध आहे. प्रोमेट कंपनीने या स्मार्टवॉच मध्ये बिल्ड इन पिडोमीटर दिले आहे. याशिवाय हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन लेव्हल आणि स्लिप पॅटर्न चेक करण्यासाठी ऑप्शन देखील उपलब्ध आहे.

कॉलिंग साठी इनबिल्ड माईक आणि स्पीकर उपलब्ध

PROMET XWATCH B2 या स्मार्टवॉच ब्लूटूथ सपोर्ट उपलब्ध आहे. त्यानुसार ब्लूटूथ सपोर्ट च्या माध्यमातून कॉलिंग देखील करता येऊ शकते. कॉलिंग साठी या स्मार्टवॉच मध्ये इनबिल्ड माईक आणि स्पीकर देण्यात आले आहे.  या स्मार्टवॉचला वॉटर रेजिस्टेन्स सर्टिफिकेट देण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही हे स्मार्टवॉच पाण्यामध्ये देखील वापरू शकता. यामध्ये व्हॉइस असिस्टंट, नोटिफिकेशन, स्मार्ट अलर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

किंमत किती?

हे स्मार्टवॉच ios आणि अँड्रॉइड डिवाइस ला सपोर्ट करते. यासोबतच स्मार्टवॉच युजर्स XWATCH ॲपच्या माध्यमातून पूर्ण डेटा एक्सेस करू शकतात. कंपनीने हे स्मार्टवॉच 2699 रुपयात उपलब्ध केलं आहे. या स्मार्टवॉच वर 12 महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. तुम्ही हे स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन इंडिया आणि प्रोमेट कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून खरेदी करू शकतात. हे स्मार्टवॉच ब्ल्यू, ब्लॅक, ग्रिफाइड कलर्स मध्ये उपलब्ध आहे.