Activa ला टक्कर देतेय Yamaha ची ही स्कुटर; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । सध्या नवरात्र उत्सवाचा जल्लोष प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. आज दसरा असून या पवित्र दिवशी वाहन खरेदी करणे हे भारतात शुभ मानले जाते. त्यानुसार तुम्ही देखील दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला Activa पेक्षाही दमदार फीचर्सने सुसज्ज असलेल्या हायब्रीड स्कूटर बद्दल सांगणार आहोत, ही स्कुटर Yamaha कंपनीची असून Yamaha Fascino 125 FI Hybrid असे तिचे नाव आहे. आज आपण स्कुटरचे खास फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेणार आहोत.

   

स्पेसिफिकेशन

Yamaha Fascino 125 FI Hybrid मध्ये कंपनीने SMG MOTORS उपलब्ध केली आहे.  ही मोटर बॅटरी सोबतच काम करते. त्याचबरोबर ही मोटर एनर्जी जनरेट करण्यासाठी देखील मदत करते. या स्कूटर मध्ये 125cc ब्ल्यू कोर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन  5000 rpm वर 10.3 Nm पिक टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर हे इंजिन स्मूथ आणि अप्रतिम ड्रायव्हिंग रेंज प्रदान करते. या स्कुटरचे टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास इतकं आहे.

बेकिंग सिस्टीम

Yamaha Fascino 125 FI Hybrid या स्कूटरमध्ये 21 लिटर अंडर सीट स्टोरेज उपलब्ध आहे. यामध्ये अलॉय व्हील देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या स्कूटरमध्ये सेफ्टी साठी फ्रंट आणि रियल मध्ये डिस्क ब्रेक वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने या अप्रतिम स्कूटर मध्ये 5.2 लिटरचा फ्युएल टॅंक उपलब्ध केला आहे. आणि ही स्कूटर 14 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.

फिचर्स

Yamaha Fascino 125 FI Hybrid मध्ये  LED हेडलाईट आणि V पॅटर्न मध्ये टेललाईट देण्यात आले आहेत. स्कूटरच्या समोर एप्रन माउंटेन टर्न इंडिकेटर देण्यात आले आहे. यामध्ये ड्रम ब्रेक चा ऑप्शन उपलब्ध आहे. Yamaha च्या या स्कूटर मध्ये डिजिटल कन्सोल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासारखे बरेच फीचर्स कंपनीने उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, ओडोमीटर फ्युल गेज, एक स्टार्टर मोटर जनरेटर SMG, इन्स्ट्रुमेंट कन्सोल यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत किती?

Yamaha Fascino 125 FI Hybrid या स्कूटरची किंमत 79,600 रुपये एवढी असून  या स्कूटरच्या टॉप वेरिएंट ची किंमत 92,530 रुपये एवढी आहे. कंपनीने ही स्कूटर वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केली असून  हाय परफॉर्मन्स आणि हाय मायलेज देणारी अशी ही स्कूटर आहे. ही स्कूटर  बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या TVS ntorq, Honda Shine, TVS Jupiter, Hero Maestro edge, Activa या स्कूटरला जोरदार टक्कर देईल.