Yamaha ची ‘ही’ Scooter देतेय जबरदस्त मायलेज; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळे मायलेज देणाऱ्या टू व्हीलर आणि स्कूटर उपलब्ध आहेत. आपण नेहमीच कोणतीही गाडी खरेदी करत असताना ती नेमकी किती मायलेज देते याचा विचार करत बसतो आणि मगच गाडी खरेदी करत असतो. तुम्ही सुद्धा सध्या नव्या वर्षाच्या मुहूर्तावर नवी स्कुटर खरेदी करणार असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका गाडी बद्दल सांगणार आहोत जी जास्त मायलेज देत असून तुम्हाला नक्कीच परवडणारी असेल. Yamaha Fascino 125 Fi Hybrid असे या स्कुटरचे नाव असून आज आपण तिचे फीचर्स आणि किंमत जाणून घेणार आहोत.

   

किंमत

Yamaha Fascino 125 Fi Hybrid  ही एक स्टायलिश स्कूटर आहे. या स्कूटर ची किंमत 79,600 रुपये एवढी असून  या स्कूटरच्या टॉप वेरिएंट ची किंमत  92,530 रुपये एवढी आहे. कंपनीने ही स्कूटर वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केली असून  हाय परफॉर्मन्स आणि हाय मायलेज देणारी ही स्कूटर आहे. ही स्कूटर बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेल्या  TVS ntorq, Honda Shine, TVS Jupiter, Hero Maestro edge या स्कूटर सोबत प्रतिस्पर्धा करते.

स्पेसिफिकेशन

Yamaha Fascino 125 Fi Hybrid मध्ये कंपनीने SMG MOTORS उपलब्ध केली आहे.  ही मोटर बॅटरी सोबतच काम करते. त्याचबरोबर ही मोटर एनर्जी जनरेट करण्यासाठी देखील मदत करते. या स्कूटर मध्ये 125cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन  5000 rpm वर 10.3 Nm पिक टॉर्क जनरेट करते. Yamaha Fascino 125 Fi Hybrid एक लिटर पेट्रोल मध्ये तब्बल 68.75 मायलेज देते. तसेच या स्कुटरचे टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रति तास इतकं आहे.

कलर ऑप्शन

Yamaha Fascino 125 Fi Hybrid मध्ये 21 लिटर अंडर सीट स्टोरेज उपलब्ध आहे. यामध्ये अलॉय व्हील  देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या स्कूटरमध्ये सेफ्टी साठी फ्रंट आणि रियल मध्ये डिस्क ब्रेक वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने या अप्रतिम स्कूटर मध्ये 5.2 लिटरचा फ्युएल टॅंक उपलब्ध केला आहे. तुम्ही यामाहा ची ही स्कूटर 14 कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता.

फिचर्स

YAMAHA FASCINO 125 FI HYBRID या स्कूटर मध्ये  एलईडी हेडलाईट आणि V पॅटर्न मध्ये टेललाईट देण्यात आले आहेत. या स्कूटर च्या फ्रंट मध्ये एप्रन माउंटेन टर्न इंडिकेटर देण्यात आले आहे. यामध्ये ड्रम ब्रेक चा ऑप्शन उपलब्ध आहे. या स्कूटर मध्ये डिजिटल कन्सोल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यासारखे बरेच फीचर्स कंपनीने उपलब्ध केले आहेत. या स्कूटर मध्ये कंपनीने पाच व्हेरिएंट लॉन्च केले आहे.