Yamaha ची हायस्पीड Street Bike; तरुणांना पडतेय चांगलीच भुरळ

टाइम्स मराठी । Yamaha कंपनीच्या बाईकला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते. Yamaha च्या बाईक्स या स्टायलिश लुक साठी जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशभरातील तरुणाई या गाड्यांकडे आकर्षित असते. तुम्ही देखील यामाहा कंपनीची हायस्पीड बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 115 किलोमीटर टॉप स्पीड देणारी Yamaha FZ S F1 ही बाईक तुमच्यासाठी अप्रतिम ठरेल. यासोबतच तुमची उंची कमी असेल तर तुम्ही ही बाईक सहजरीत्या चालवू शकतात. कारण या बाईकच्या सीटची उंची 790 MM एवढी आहे.

   

किंमत

Yamaha FZ S F1 या बाईक मध्ये कंपनीने तीन कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे. ही बाईक 1.21 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत तुम्ही खरेदी करू शकतात. या बाईकचे वजन 135 किलो एवढे असून ही एक स्ट्रीट बाईक आहे. यामध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात आले असून बाईक मायलेज देखील अप्रतिम देते. जाणून घेऊया  यामाहा कंपनीच्या या हायस्पीड बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

पावरट्रेन

Yamaha FZ S F1 मध्ये कंपनीने 149 cc इंजिन दिले आहे. हे इंजिन सिंगल सिलेंडर सह मिळते. हे इंजिन 7250 rpm वर 12.2 BHP पावर आणि 5500 RPM वर 13.3  NM पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिन सोबत कंपनीने 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतेय. ही बाईक 45 KM प्रति लिटर एवढे मायलेज देते.  Yamaha FZ S F1 ही बाईक 2 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून 13 लिटरची मोठी फ्युअल टाकी यामध्ये मिळते. जेणेकरून लांबच्या प्रवासात पेट्रोल भरण्याचे टेन्शन येत नाही.

फिचर्स

Yamaha FZ S F1 या बाईकमध्ये आकर्षक ड्युअल टोन सीट मिळते. कंपनीने या बाईक मध्ये LED टेललाईट दिले आहे. यासोबतच बाईकचा ग्राउंड क्लिअरन्स देखील अप्रतिम आहे. यामध्ये कंपनीने मल्टी फंक्शन LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सिंगल चैनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, देण्यात आली आहे. या बाईकच्या फ्रंट आणि रियर मध्ये डिस्क ब्रेक, फ्रंट साईडने टेलिस्कोपिक फोर्क, रियर मध्ये मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत बाईक स्मूथली राईड करता येईल.