टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत हाय स्पीड स्कूटर मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे Yamaha कंपनीची RayZR 125 Fi Hybrid Disc स्कुटर. यंदा दिवाळीनिमित्त तुम्ही हाय स्पीड स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे डील तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. दिवाळी निमित्त यामाहा कंपनीने या हायब्रीड स्कूटर वर फायनान्स प्लान उपलब्ध केला आहे. त्यानुसार तुम्ही ही स्कुटर 10000 रुपयांत खरेदी करू शकता. ही स्कूटर अप्रतिम डिझाईन सह उपलब्ध आहे. जाणून घेऊया या हायब्रीड स्कूटरचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.
दिवाळी स्पेशल ऑफर- Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc
Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc ही यामाहा कंपनीची हायब्रीड स्कूटर 93,600 रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटर वर दिवाळीनिमित्त फायनान्स प्लॅन उपलब्ध आहे. त्यानुसार तुम्ही 10,000 रुपये डाऊन पेमेंट भरून ही स्कूटर खरेदी करू शकतात. या स्कीम मध्ये तुम्हाला 3 वर्षांसाठी 9.7% व्याजदर नुसार 2,823 रुपये प्रति महिना भरावा लागेल. दिवाळीनिमित्त तुम्ही कमी किमतीमध्ये ही स्कूटर घरी घेऊन जाऊ शकतात.
लूक
Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc या हायब्रीड स्कूटरमध्ये आरामदायक प्रवासासाठी सिंगल सीट देण्यात आले आहे. ही स्कूटर समोरच्या साईडने मस्क्युलर आणि बोल्ड लूक देते. या स्कूटरचे एकूण वजन 98 kg एवढे आहे. ही स्कूटर रस्त्यावर कंट्रोल करणे सोपे असून या स्कूटर च्या एक्झॉस्ट मध्ये कव्हर देण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने तीन कलर ऑप्शन उपलब्ध केले आहे. यामध्ये मेटॅलिक ब्लॅक, Clyan Blue, मॅट रेड या रंगांचा समावेश आहे.
स्पेसिफिकेशन
ही हायब्रीड स्कूटर 125cc इंजिन सह उपलब्ध आहे. हे इंजिन 8.2 ps पावर आणि 10.3 nm पीक टॉर्क जनरेट करते. या स्कूटर च्या मायलेज बद्दल बोलायचं झालं तर, 71.33 किलोमीटर प्रति लिटर हाय मायलेज देते. यासोबतच प्रतीतास 91 किलोमीटरच्या वेगवान स्पीडने हि स्कुटर धावते. हायब्रीड स्कूटर मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या TVS NTORQ 125 या स्कूटर सोबत प्रतिस्पर्धा करते.
फिचर्स
या स्कूटरमध्ये LED लाईट आणि इंडिकेटर उपलब्ध आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर दिले आहे. यासोबतच स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि ब्रेकिंग साठी डिस्क ब्रेक वापरण्यात आला आहे. यामध्ये आरामदायक हँडल बार देखील उपलब्ध आहे.