टाइम्स मराठी । Yamaha RX 100 च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकेकाळी देशभरातील तरुणाईवर भुरळ पाडणारी यामाहाची ही बाईक आता नव्या अवतारात लाँच होणार आहे. याआधीही अनेकदा Yamaha RX 100 रिलाँच करण्याच्या बातम्या आल्या आहेत, पण यावेळी कंपनीने या बाईकच्या लाँचिंग बद्दल उघडपणे सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना नव्या अवतारात आणि आकर्षक फीचर्ससह Yamaha RX 100 पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते.
YAMAHA RX 100 चे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन लुक आणि अप्रतिम व्हर्जन मध्ये लॉन्च होणार आहे. 1980 पासून आतापर्यंत यामाहाच्या या बाईकची क्रेझ कमी झालेली नाही. यापूर्वी ही बाईक टू स्ट्रोक इंजिन सह उपलब्ध होती. पण आता BS 6 नॉर्म्स ने सुसज्ज असण्याची शक्यता आहे. म्हणजेच आता यामाहाच्या नवीन मॉडेल चे इंजन हे टिकाऊ असेल.
125cc इंजिन – Yamaha RX 100
YAMAHA RX 100 यामध्ये 125cc इंजिन मिळू शकते. यापूर्वीच्या RX 100 बाईकमध्ये एयर कोल्ड सिंगल सिलेंडर इंजन उपलब्ध करण्यात आले होते. हे सिंगल सिलेंडर 7 वॅट्स टॉर्क जनरेट करत होते. आणि या इंजिन ची कॅपॅसिटी 10.39 एनएम एवढी होती. या बाईकमध्ये फ्रंट आणि बॅक साइडने ड्रम ब्रेक देण्यात येत होता. YAMAHA RX 100 ही बाईक डिझाईन आणि साऊंडमुळे मोठ्या प्रमाणात ओळखली जाते. दरम्यान, नवीन YAMAHA RX 100 च्या अपडेटेड मॉडेलच्या मायलेज फिचरबद्दल कंपनीने आणखीन कोणतीच माहिती दिलेली नसली तरीही यामाहा कंपनीची ही बाईक अप्रतिम व्हर्जन मध्ये उपलब्ध असेल अशी आशा आहे. तसेच यामाहाच्या नवीन मॉडेलमध्ये स्टायलिश राऊंड लाईट सुविधा देखील मिळू शकते.