Yamaha Tenere 700 Extereme : 689CC इंजिनसह Yamaha ने लाँच केली ऑफ रोडींग बाईक; किंमत किती?

Yamaha Tenere 700 Extereme : सध्या ऑफ रोडींग बाईक तरुणांना चांगलंच आकर्षित करत आहे. पहाडी रस्त्यावर खास करून सैर करण्यासाठी या गाडयांचा वापर केला जातो. अनेक कंपन्यांनी गेल्या वर्षभरात ऑफ रोडींग बाईक बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Yamaha ने सुद्धा आपली Yamaha Tenere 700 Extereme ही बाईक बाजारात आणली आहे. या बाईकचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 689CC चे दमदार इंजिन मिळत आहे. सध्या ही बाईक जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आली असून पुढच्या वर्षी ही बाईक भारतात लॉन्च होऊ शकते. आज आपण जाणून घेऊया या बाईकचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स.

   

स्पेसिफिकेशन– Yamaha Tenere 700 Extereme

Yamaha Tenere 700 Extereme मध्ये 689CC, CP2, ट्विन लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन क्रॉसप्लेन क्रॅकशाफ्ट पॅरेलल सह उपलब्ध आहे. हे डबल क्रॅंडल स्टील ट्यूब फ्रेम मध्ये डेव्हलप करण्यात आले आहे. Yamaha च्या या बाईकमध्ये देण्यात आलेले इंजिन 73.4 HP पावर आणि 68 NM पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 20 MM सस्पेन्शन देण्यात आले आहे. यासोबतच काशीमा कोटिंग सह KYB फ्रंट फोर्क 43MM उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे बाईकला मस्त असं सस्पेन्शन मिळते. यासोबतच कोटिंग मुळे ड्युरेबिलिटीला देखील सुरक्षित ठेवता येते. या बाईकच्या रियरमध्ये ऍडजेस्टेबल KYB मोनोशॉक उपलब्ध करण्यात आले आहे.

सीट सेटअप

Yamaha Tenere 700 Extereme या बाईकमध्ये 35 टक्के जास्त सरफेस स्पेस उपलब्ध करण्यात आला आहे. यासोबतच ॲल्युमिनियम रेडिएटर प्रोटेक्टर,  वन पीस सीट सेटअप देखील यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. कंपनीने या बाईक मध्ये उपलब्ध केलेल्या सीटची उंची 910 mm एवढी आहे. आणि ग्राउंड क्लिअरन्स 260 mm इतका आहे.

फिचर्स

Yamaha Tenere 700 Extereme या बाईक मध्ये देण्यात आलेल्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 5 इंच चा फुल कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. या TFT डिस्प्ले मध्ये रॅली स्टाईल डिस्प्ले, नेव्हिगेशन यासारख्या बऱ्याच सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कंपनीने या बाईकच्या फेंडर ला मलबा आणि घाणीपासून वाचण्यासाठी वेगळा भाग उपलब्ध केला आहे. या बाईकमध्ये कंपनीने गोल्ड एनोडाइस फिनिशिंग असलेले ॲल्युमिनियम स्पोक व्हील उपलब्ध केले आहे.

किंमत किती?

या बाईकचा किमतीबद्दल बोलायचं झालं तर, ही बाईक आठ ते नऊ लाख रुपयांच्या किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकते.