Yamaha लवकरच मार्केटमध्ये लॉन्च करणार YZF R3 आणि MT03 बाईक

टाइम्स मराठी । Yamaha कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत दोन बाईक्स लॉन्च करणार आहे. या अपकमिंग बाईकचे नाव  YZF R3 आणि MT 03 आहे. कंपनी लॉन्च करणार असलेली YZF R3 ही बाईक फेअरेड स्पोर्ट्स टूरर आहे. आणि MT03 ही पूर्वीच्या स्पोर्ट मॉडेलची आवृत्ती आहे. या मॉडेलमध्ये एक्सपोज मेकॅनिकल सह एक लूक प्रदान करण्यात आला आहे. कंपनी दोन्ही बाइक्स लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. जाणून घेऊया या बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

   

स्पेसिफिकेशन

YZF R3 आणि MT 03  या अपकमिंग बाईक मध्ये 321cc लिक्विड कुल्ड पॅरेलल ट्विन इंजिन देण्यात आली आहे. हे इंजिन 40 bhp पावर आणि 29.6  nm पिक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड गिअर बॉक्स आणि स्लिप क्लच ने जोडण्यात आले आहे. MT 03 बाईक लॉन्च झाल्यानंतर KTM 390 ड्यूक, BMW जीG 310 R आणि TVS RTR 310 सोबत प्रतिस्पर्धा करेल.

किंमत किती

YZF R3 आणि MT 03 या दोन्ही यामाहा कंपनीच्या बाईक भारतात लॉन्च झाल्यानंतर भारतातील सर्व यामाहा ब्ल्यू स्क्वायर शोरूम मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. कंपनी या बाईक सीबीयु मार्गाने भारतात लॉन्च करणार आहे. त्यामुळे YZF R3 ची किंमत 4.2 लाख असेल आणि MT 03 या बाईकची किंमत 3.8 लाख रुपये असू शकते.