फक्त रस्त्यावरच नव्हे तर पाण्यावरही चालते ‘ही’ Electric SUV; देतेय 1000 KM रेंज

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती पाहता मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट कडे वळत आहेत. त्याचबरोबर या कंपन्या नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसह इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करत आहेत. अशातच चिनी ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाणारी बिल्ड युअर ड्रीम्स BYD या कंपनीने प्रीमियम ब्रँड YangWang Electric SUV लॉन्च केली आहे. YangWang U8 असं या इलेक्ट्रिक SUV च नाव आहे. ही इलेक्ट्रिक SUV फक्त रस्त्यावरच नव्हे तर पाण्यातही चालते आणि एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही गाडी तब्बल १००० किलोमीटर पर्यंत रेंज देते. जाणून घेऊया या नवीन Electric SUV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

YangWang U8 या इलेक्ट्रिक SUV मध्ये 2.0 लिटर क्षमता असलेले टर्बो चार्ज पेट्रोल इंजन देण्यात आले आहे. त्याचबरोबर कंपनीने यामध्ये 49 kwh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 30 ते 80% चार्ज होण्यासाठी 18 मिनिटे लागतात. ही SUV एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 1000 किलोमीटर पर्यंत चालू शकते. त्याचबरोबर कंपनीने या SUV मध्ये 75 लिटर फ्युएल टॅंक दिला आहे. यासोबतच कंपनीने या एसयुव्ही मध्ये प्लग इन हायब्रीड सिस्टीम सह चार इलेक्ट्रिक मोटर दिल्या आहेत. ही मोटर 1180 hp पावर जनरेट करते.

फीचर्स

YangWang U8 या इलेक्ट्रिक SUV कार मध्ये हाय रिझोल्युशन डिस्प्ले, वायरलेस चार्जर, 22 स्पीकर सेटअप, मल्टीजोन क्लायमेट कंट्रोल, लेदर सीट यासारखे फीचर्स इंटिरियर मध्ये देण्यात आले आहे. त्याचबरोबर या SUV कॅमेरा देखील देण्यात आला आहे. जेणेकरून प्रत्येक अपडेट कार मधील डिस्प्ले वर मिळत राहतील.

स्पेशालिटी

YangWang U8 ही SUV अशाप्रकारे डिझाईन करण्यात आली आहे, सर्व डोर आणि एक्झिट पॉईंट सील लॉक राहतील. जेणेकरून पाणी कार मध्ये घुसणार नाही. ही एसयुव्ही 30 मिनिटांपर्यंत 3 किलोमीटर पाण्यात चालण्यास सक्षम आहे. म्हणजेच ही SUV पाण्यामध्ये देखील चालू शकते. गाडीचे डिझाईन अशाप्रकारे करण्यात आले आहे, यानुसार ती रस्त्यावरच नाही तर पाण्यामध्ये देखील स्पीड मध्ये चालू शकेल.

किंमत

या एसयूव्ही ची किंमत 1.5 लाख डॉलर एवढी असून भारतीय चलनानुसार 1 करोड 24 लाख रुपये एवढी आहे. ही SUV भारतामध्ये लॉन्च होणार आहे की नाही याबाबत आणखीन माहिती मिळाली नाही.