आता AI च्या मदतीने YouTube वरून बनवा अँकर व्हिडिओ

टाइम्स मराठी । सध्याच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होताना दिसत आहे. सॉफ्टवेअर कंपनी, स्मार्टफोन कॅमेरा एप्लीकेशन google यासारख्या बरेच ॲप्समध्ये आणि बराच कंपन्यांमध्ये देखील आता आर्टिफिशियल इंटेलिजंट वापरण्यात येत आहे. हे डिजिटल युगाच्या माध्यमातून अप्रतिम जरी असलं तरी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बरेच फ्रॉड सुद्धा होत आहेत. एकंदरीत आर्टिफिशियल इंटेलिजंट टूल्स हे मानव करत असलेले संपूर्ण कामे करतो.

   

आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच युट्युब फेसबुक instagram या प्लॅटफॉर्मवर रिल्स किंवा व्हिडिओ तयार करून पैसे कमवले जात आहे. त्याचबरोबर इंस्टाग्राम रिल्स आणि youtube शॉर्ट देखील मोठ्या प्रमाणात युजर्स बनवत आहे. तुम्हाला देखील असे Reels किंवा Videos बनवायचे असेल परंतु कॅमेराचा सामना करण्यासाठी घाबरत असाल तर आता आर्टिफिशल इंटेलिजंट टूलच्या मदतीने तुम्ही विदाऊट अँकरिंग व्हिडिओज बनवू शकतात. या आर्टिफिशल इंटेलिजन्स टूलचे नाव हेजेन AI व्हिडिओ जनरेटर असं आहे. या टूलचा वापर ब्राउझर आणि एप्लीकेशन दोन्ही मध्ये करता येऊ शकतो. त्यासाठी जास्त मेहनत घ्यायची गरज नसून सोप्या पद्धतीने तुम्ही हे टूल्स वापरू शकतात. त्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

1) सर्वात आधी ब्राउझर मध्ये HeyGen.com  ही लिंक टाकून ओपन करा.
2) हे पेज ओपन झाल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला Try Hagen for free असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
3) त्यानंतर तुम्हाला काही प्रोसेस करावी लागेल.
4) या प्रोसेस नंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून फोटो किंवा सॅम्पल व्हिडिओ अपलोड करावा लागेल.
5) त्यानंतर हे ॲप AI Tool च्या मदतीने तुमचा व्हिडिओ जनरेट करेल. आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ डाऊनलोड करू शकतात.

या पद्धतीने तुम्ही तुमचा एखादा सॅम्पल स्क्रिपेड व्हिडिओ या लिंक वर शेअर केल्यानंतर तुम्हाला परफेक्ट व्हिडिओ मिळेल. त्यासाठी तुम्हाला स्क्रिप्ट आणि फोटो नमुना प्रदान करणे गरजेचे आहे.