चॅटींगचा स्क्रीनशॉट घेतल्यावर तुम्हाला मिळेल नोटिफिकेशन; लाँच झालं नवं फीचर्स

टाइम्स मराठी । गुगल गेल्या काही महिन्यांपासून युजर साठी वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत आहे. आता कंपनीने आणखीन एक धमाकेदार फीचर लॉन्च केले असून या फिचरच्या माध्यमातून युजर्सला प्रायव्हसी मेंटेन करता येईल. आपण बऱ्याचदा काही व्यक्तींचे चॅट लीक झाल्याचं ऐकलं असेल. कारण बरेच युजर्स  चॅटींगचा स्क्रीनशॉट घेऊन वायरल करत असतात. परंतु आता असे होणार नाही. कारण गुगलने यासाठी स्पेशल फीचर उपलब्ध केले आहे. या फीचरच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल.

   

काय आहे हे फीचर

गुगलने लॉन्च केलेले हे फीचर कंपनीने API फॉर्म मध्ये रिलीज केले आहे. जेणेकरून ॲप्स किंवा प्लॅटफॉर्मवर इंटिग्रेट करता येईल. सध्या तरी हे फीचर इंस्टाग्राम फेसबुक मेसेंजर आणि स्नॅपचॅट मध्ये उपलब्ध आहे. इंस्टाग्राम वर हे फीचर वापरण्यासाठी  तुम्हाला चॅट मध्ये स्वाईप करून इनेबल करावे लागेल. त्यानंतर instagram वर तुमच्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट घेतल्यावर तुम्हाला लगेच समजेल. हे प्रायव्हसी रिलेटेड फिचर google ने अँड्रॉइड युजर साठी लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे. 

अशा पद्धतीने करेल काम

 गुगलचे हे नवीन फीचर ॲप्स किंवा प्लॅटफॉर्मवर इंटिग्रेट करावे लागेल. या नवीन फीचर च्या  माध्यमातून एखाद्या व्यक्तीने चॅटिंगचा स्क्रीनशॉट घेतला तर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला स्क्रीनशॉट केव्हा आणि कोणी घेतला हे समजेल. या फीचरच्या माध्यमातून  गुगलने युजर्सची प्रायव्हसी सिक्युअर करण्यासाठी पाऊल उचलले आहे. सध्या तरी हे फीचर अँड्रॉइड युजर साठी रोल आउट करण्यात आलेले नाही.