तुमचाही Mobile हळू हळू चार्ज होतो? Setting मध्ये जाऊन करा हे बदल

टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण दिवसभर आपला मोबाईल सोबत बाळगत असतो. अशातच आपल्या मोबाईलची चार्जिंग संपले किंवा कमी झाली तरी आपली चिडचिड होत असते. अनेकांना दिवसात बऱ्याचदा मोबाईल चार्जिंग करायची सवय असते. बऱ्याचदा मोबाईल सकाळी चार्जिंग करून देखील जास्त वापरामुळे मोबाईलचे चार्जिंग लो होऊन जाते. त्यामुळे सतत मोबाईल चार्जिंगला लावावा लागतो. कधी कधी तर बऱ्याचदा मोबाईलचे चार्जिंग खूप हळू हळू होत असते. अशावेळी तुम्ही काही ट्रिक्स वापरून तुमचा मोबाईल फास्ट चार्ज करू शकतात.

   

अनेकदा आपल्या मोबाईलचा स्पेशल चार्जर सापडत नसल्यामुळे आपण दुसऱ्या कोणत्याही चार्जरने मोबाईल चार्ज करतो. परंतु या चार्जर चा परिणाम आपल्या मोबाईलवर दिसत असतो. सर्व फोन हे वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे आपल्याच मोबाईलच्या चार्जरनेच मोबाईल चार्ज करणे गरजेचे आहे. कोणतेही चार्जर वापरल्यामुळे मोबाईल चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्याचबरोबर मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर देखील बरेच जण मोबाईल हातातच घेऊन बसतात त्यामुळे सुद्धा मोबाईल चार्ज होण्यासाठी वेळ लागतो.

जर तुमचाही मोबाईल हळू हळू चार्ज होत असेल तर या ट्रिक्स फॉलो करा,

  1. सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधील सेटिंग मध्ये जा.
  2. त्यानंतर अबाउट फोन मध्ये जा.
  3. अबाउट फोन मध्ये गेल्यानंतर डेव्हलपर ऑप्शन दिसेल.
  4. या डेव्हलपर ऑप्शन फोनच्या संदर्भात बऱ्याच सीक्रेट सेटिंग लपलेल्या असतात.
  5. डेव्हलपर ऑप्शन वर क्लिक करा.
  6. डेवलपर ऑप्शन च्या खाली तुम्हाला नेटवर्किंग हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
  7. त्यानंतर सिलेक्ट यूएसबी कन्फिगरेशनहे ऑप्शन दिसेल.त्यावर क्लिक करा.
  8. यामध्ये एमटीपी ऑटो सिलेक्ट या ऑप्शन वर क्लिक करा.
  9. त्यानंतर तुम्हाला चार्जिंग हे ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल.
  10. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा फोन फास्ट स्पीड मध्ये चार्जिंग होऊ शकेल.

बऱ्याचदा काही लोक रात्री झोपण्याच्या वेळेस मोबाईल चार्जिंगला लावून ठेवतात. आणि सकाळी उठल्यावर मोबाईल चार्जिंग वरून काढतात. परंतु हे सुद्धा मोबाईलच्या दृष्टीने योग्य नसून त्याच मोठा परिणाम आपल्या मोबाईल वर होऊ शकतो. त्यामुळे कधीही मोबाईल फोन गरज असेल तरच चार्जिंगला लावणे गरजेचे आहे.