टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आता Mobile हा देखील गरजेच्या वस्तू पैकी एक झालेला आहे. बऱ्याचदा जास्त स्मार्टफोन वापरल्यामुळे आपल्याला त्याचे नुकसान भोगावे लागतात. पण सध्या सर्व काही ऑनलाईन पद्धतीच्या कामांमुळे अति प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करावाच लागतो. त्यामुळे आपला स्मार्टफोन बऱ्याचदा तापतो. मोबाईल गरम होतो याचा अर्थ त्याच्या आतील सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो आणि सतत मोबाईल गरम होणं हे काय चांगलं लक्षण नक्कीच नाही. त्यामुळे मोबाईल गरम होऊ नये यासाठी आपल्याला काही सवयी सोडून द्यावा लागतील आणि विशेष काळजी घ्यावी लागेल. आज आम्ही तुम्हाला असेल ३ उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुमचा मोबाईल गरम होण्यापासून बचाव होऊ शकतो.
1) मोबाईल जास्तवेळ सूर्यप्रकाशात ठेवू नका –
सूर्यप्रकाशाच्या संपर्कामुळे स्मार्टफोनचे तापमान वाढते. त्यामुळे तो गरम पडू शकतो. याचा परिणाम म्हणजे तुमचा मोबाईल कायमचा खराब देखील होण्याची शक्यता असते. तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावत असाल, खिडकीमध्ये ठेवत असाल तर या स्मार्टफोनवर सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. किंवा गाडीवर असताना पॅन्टच्या खिशात जरी तुमचा मोबाईल असेल तर तो उलट्या बाजूने ठेवा, म्हणजे मोबाईल स्क्रिन आतील बाजूला असावी आणि कव्हर बाहेरील बाजूला असावे.
2) स्मार्टफोन कव्हर-
बऱ्याचदा फॅशन म्हणून आपण स्मार्टफोनचे कव्हर वापरत असतो. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या स्टाईलचे मोबाईल कव्हर उपलब्ध असतात. त्याचा मुख्य हेतू हा असतो की स्मार्टफोन पडल्यावर खराब होऊ नये. परंतु काहीजण कव्हरची क्वालिटी न बघता फक्त दिसायला आकर्षक असलं तरी ते कव्हर खरेदी करतात. पण कधी कधी काही कव्हर मुळेही मोबाईल गरम होण्याची शक्यता असते त्यामुळे कव्हर खरेदी करताना काळजी घ्या.
3) जास्त गेम खेळणे टाळणे-
जर तुम्ही फोनवर हेवी प्रकारच्या गेम खेळत असाल तर ही सवय स्मार्टफोनसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे फोनच्या सिस्टीम मध्ये याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर जर तुम्ही बजेट स्मार्टफोनवर गेमिंग खेळत असाल तर ते अजून धोकादायक ठरू शकते, कारण हे बजेट स्मार्टफोन गेमिंग साठी बनवलेले नसतात. त्यात कुलिंग पॅड वापरलं जात नाही. अशावेळी जास्त गेम खेळल्यामुळे मोबाईल तापतो.