सावधान!! Youtube वर ‘अशा’ प्रकारे Video पाहत असाल तर तुमचं अकाउंट होणार Block

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच युट्युब वर आपण मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर करत असतो. युट्युबवर व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. Youtube वरच्या व्हिडिओमध्ये कधी किचन रिलेटेड, रेसिपी, होम डेकोरेशन चे व्हिडीओ तर बऱ्याचदा कॉमेडी व्हिडिओ असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध असतात. हे व्हिडिओज आपण पाहत असताना बऱ्याच Ads व्हिडीओ मध्ये येतात. काही वेळा तर व्हिडिओ कमी पण Ads मोठ्या प्रमाणात दिसतात. या Ads आपण ब्लॉक करतो, परंतु इथून पुढे असं केल्यास तुमचंच अकाउंट ब्लॉक होईल.

   

Youtube वर जसजसे यूजर्स आणि क्रियेटर्स वाढत आहे. त्याप्रमाणे युट्युब वर Ads सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर उपाय म्हणून बरेच जण Youtube ads bloker या ऑप्शन चा वापर करतात. यामुळे विना एड्स व्हिडिओ बघणे सोपे होते. परंतु आता युट्युब यावर कडक नियम लावण्याच्या तयारीत आहे. युट्युब आता लवकरच नवीन 3 Strike policy आणणार आहे. त्यानुसार जर तुम्ही आता तीन यूट्यूब व्हिडिओज Youtube ads bloker या ऑप्शनचा वापर करून बघत असाल तर युट्युब तुम्हाला ब्लॉक करू शकते.

याबाबत एका युजरने थ्री स्ट्राइक पॉलिसी पॉप चा स्क्रीन शॉट घेऊन पोस्ट केला होता. या पॉलिसीमध्ये तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरल्यानंतर Youtube ते शोधून काढणार आहे. यानंतर Youtube युजर्सला याबाबत माहिती आणि इशारा देईल . हा इशारा दिल्यानंतर देखील युजर्स तीन व्हिडिओ एड्स ब्लॉक करून बघत असतील तर त्यांना ब्लॉक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला युट्युब वर ऍड शिवाय व्हिडिओज बघायचे असतील तर Youtube चे प्रीमियर सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 129 रुपये मोजावे लागतील. या प्रीमियम सबस्क्रीप्शन मध्ये Youtube वर ऍड फ्री एक्सेस देण्यात येतो. त्याचबरोबर युट्युब म्युझिक ची सुविधा देखील यात उपलब्ध आहे.