YouTube हटवले 19 लाख Video; हे आहे मोठं कारण

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी Youtubeवर मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन व्हिडिओज बघायला मिळतात. युट्युब वर हे व्हिडिओज पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. परंतु बऱ्याच Youtube चैनल वर समाजात द्वेष पसरवणाऱ्या बातम्या आणि माहिती पसरवली जाते. त्याचबरोबर खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल देखील केली जाते. त्याचबरोबर भारतामध्ये कम्युनिटी गाईडलाईनचे उल्लंघन केल्यामुळे 19 लाख व्हिडीओ डिलीट केले आहे. हे व्हिडिओ जानेवारी मार्च या तिमाही मधील असून गुगलच्या नेतृत्वाखाली youtube ने ते हटवले आहेत.

   

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी मार्च या महिन्यात Youtube च्या स्पॅम पॉलिसीच्या माध्यमातून स्कॅम, दिशाभूल करणारे मेटाडेटा, थम्बनेल व्हिडिओज आणि कमेंट्स करणारे अकाउंट आणि व्हिडिओज रिमूव केले आहे. या सोबतच youtube वर आलेल्या 853 मिलियन पेक्षा जास्त कमेंट देखील युट्युब ने हटवले आहेत. युट्युब वर आलेल्या या कमेंट पूर्णपणे स्पॅम प्रकारात होत्या.

काय म्हणाले Youtube

वर्षभरापासून युट्युब कम्युनिटीच्या सुरक्षेसाठी इम्पॉर्टंट पॉलिसी आणि प्रोडक्स मध्ये आम्ही गुंतवणूक केली आहे. आज जास्त क्रियेटर्स विश्वासार्हतेने कंटेंट अपलोड करत असतात. हे क्रियेटर्स आमच्या पॉलिसीचे उल्लंघन करत नाही. त्यासोबतच बरेच जण आमच्या धोरणांचे पालन करत नसल्यामुळे आम्ही त्यांचे व्हिडिओज आणि अशा क्रियेटर्सला youtube वरून हटवत आहोत. आणि त्यांची संख्या कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो असल्याचं देखील युट्युब ने सांगितलं.

93 पेक्षा जास्त व्हिडिओ मशीनच्या माध्यमातून केले चिन्हांकित

युट्युब मे रिमूव केलेले 93% टक्क्यांपेक्षा जास्त व्हिडिओज हे मानवा ऐवजी मशीन यांच्या माध्यमातून चिन्हांकित केले होते. या व्हिडिओचा शोध घेऊन त्यापैकी 38% व्हिडिओ हे एकदाच पाहून रिमूव करण्यात आले होते. आणि 31 टक्के व्हिडिओज हे दहा वेळेस बघण्यात आले होते. 69% व्हिडिओज हे पहिल्यांदाच मशीनच्या माध्यमातून ओळखले गेले. आणि हे व्हिडिओज दहा पेक्षा जास्त वेळेस बघण्यात आले होते. आता हे व्हिडिओ युट्युब वरून काढून टाकण्यात आले आहे.

अमेरिकेत एवढे व्हिडिओज केले रिमूव

भारतामध्ये जानेवारी ते मार्च या तिमाही मध्ये 19 लाख पेक्षा जास्त व्हिडिओ हटवण्यात आले होते. या तुलनेमध्ये अमेरिकेत 6.54 लाख व्हिडिओ, रशियामध्ये 4.91 लाख व्हिडिओ, ब्राझीलमध्ये 4.49 लाख व्हिडिओ आतापर्यंत हटवण्यात आले आहे. म्हणजे भारताचा हा आकडा प्रचंड मोठा आहे.