Youtube वापरणं होणार आणखी मजेशीर; कंपनी लाँच करतेय हे 5 फीचर्स

टाइम्स मराठी ।आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच जण ऑनलाइन असतात. यासोबतच बरेच जण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर करून पैसे देखील कमवत आहेत. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फीचर्स देखील कंपनीकडून उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार आता google च्या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या Youtube वर देखील कंपनीकडून नवीन नवीन फीचर्स रोल आउट करण्यात येत आहे.  या नवीन फीचर्स मुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळणे अगदी सोपे झाले आहे. त्यानुसार जाणून घेऊया Youtube वर उपलब्ध होणाऱ्या काही फीचर्स बद्दल.

   

गाणे गुणगुणल्यास मिळेल ओरिजनल रेकॉर्डिंग

युट्युब मध्ये वेगवेगळे फीचर्स आता लॉन्च करण्यात येणार आहे.  त्यानुसार Youtube मध्ये व्हिडिओ सर्च करणे आता आणखीनच सोपे होईल. कारण व्हिडिओ सर्चिंग साठी युट्युब मध्ये तुम्ही कोणतेही गाणे गुणगुणले तर त्या गाण्याचे ओरिजनल रेकॉर्डिंग युट्युब शोधेल. त्याचबरोबर युजरच्या गाण्याच्या माध्यमातून Youtube वर ओरिजनल रेकॉर्डिंग सर्च करता येईल. कंपनी youtube मध्ये AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करणार आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातूनच Youtube वर ओरिजनल रेकॉर्डिंग शोधण्यासाठी मदत होईल. हे फीचर लवकरच अँड्रॉइड युजरसाठी लॉन्च करण्यात येणार आहे.

लॉक स्क्रीनला देखील सपोर्ट करेल व्हिडिओ

Youtube मध्ये आणखीन एक धमाकेदार फीचर यूजर साठी उपलब्ध होणार आहे. Youtube लावल्यानंतर जेव्हा आपल्याकडून लॉक स्क्रीनचे बटन क्लिक होते तेव्हा युट्युब बंद स्क्रीन सोबत बंद पडते. त्यानंतर पुन्हा स्क्रीन ऑन केल्यानंतर तो व्हिडिओ आपण पाहू शकतो. परंतु आता युट्युब वर लॉक स्क्रीन ऑन मोबाईल हे फीचर लॉन्च करण्यात येणार आहे. या  नवीन फिचरच्या माध्यमातून व्हिडिओ लॉक स्क्रीनला देखील सपोर्ट करेल.  म्हणजेच तुम्ही लोक स्क्रीन केल्यावर देखील व्हिडिओ चालू राहील.

प्लेबॅक स्पीड वाढेल-

Youtube वर बरेच व्हिडिओज हे मोठे असतात.  परंतु तुम्हाला व्हिडिओज मध्ये महत्त्वाचे मुद्दे पाहायचे असतील किंवा व्हिडिओ काही सेकंद पुढे घ्यायचा असेल तर यासाठी देखील एक नवीन फीचर लॉन्च होणार आहे. या फीचरनुसार तुम्ही प्लेबॅक स्पीड दुप्पट करू शकतात. आणि डबल टॅप करून दहा सेकंदापर्यंत लीप देऊ शकतात.

प्रीव्ह्यू थंबनेल-

Youtube वर एखाद्या व्हिडिओमध्ये असलेला एखादा मुव्हमेंट तुम्हाला प्रचंड आवडला असेल तर आता तुम्हाला पुन्हा डबल डबल तो व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. तुम्ही व्हिडिओ मधील तेवढा एक पार्ट पाहू शकतात. यासाठी youtube कडून प्रीव्ह्यू थंबनेल हे फीचर लॉन्च करण्यात येणार आहे. म्हणजेच युजर्स व्हिडिओ मधील कोणताही स्पेशल मोमेंट सोप्या पद्धतीने प्ले करू शकतात.

एका टॅब वर सर्व ऑप्शन

Youtube वर लायब्ररी टॅब आणि अकाउंट पेजला मर्ज करण्यात आले आहे. आणि युट्युब टॅबला देखील एक ऑप्शन मध्ये बदलण्यात आले आहे. या टॅबच्या मदतीने यूजर सेव केलेले व्हिडिओज, प्ले लिस्ट, डाऊनलोड आणि खरेदी केलेले व्हिडिओ एकाच ठिकाणी पाहू शकतील.