युवी दुसऱ्यांदा बनला बाबा; घरी आली गोंडस परी

टाइम्स मराठी । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री हेजल कीचने (Hazel Keech) एका मुलीला जन्म दिला आहे. युवराज सिंह ने चाहत्यांना सोशल मीडियावर एक पोस्ट करून गोड बातमी शेअर केली. यापूर्वी गेल्या वर्षी जानेवारी 2022 मध्ये युवराज पहिल्यांदा वडील झाला होता. त्यावेळी त्याला मुलगा झाला होता ज्याचे नाव ओरियन ठेवण्यात आलं होते

   

सोशल मीडियावर युवराज सिंग ने त्याच्या लाडक्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला युवराज सिंह चे फॅन्स आणि सेलिब्रिटींकडून प्रचंड लाईक आणि शुभेच्छा मिळाल्यात. एवढेच नाही तर युवराज सिंग आणि हेजल कीचने मुलीचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिलं की, न झोपता ही रात्र प्रचंड आनंदी वाटत आहे. कारण आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आमची राजकन्या ओराचे स्वागत केले आहे.

मुलीच्या जन्मानंतर पती-पत्नी दोघांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 30 नोव्हेंबर 2016 रोजी युवराज सिंह आणि हेजल कीच यांचे लग्न झाले होते. अभिनेता सलमान खान यांच्या बॉडीगार्ड चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका बजावत असलेली अभिनेत्री म्हणून सेजल कीच ला प्रसिद्धी मिळाली होती. हेजल कीच आणि युवराज सिंह दोघेही दुसऱ्यांदा आई-बाबा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.