5000 रुपयांत खरेदी करा Zelio Eeva इलेक्ट्रिक स्कुटर; 120 KM रेंज

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे लोकांचा पसंती जास्त वाढली आहे. बऱ्याच ऑटोमोबाईल कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवण्यामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या विक्रीमुळे कंपन्यांना फायदाही होत आहे. कमीत कमी पैशात जास्त रेंज घेण्याचा ग्राहकांचा कल असतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन हरियाणातील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Zelio आपली स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कुटर Zelio Eeva काही दिवसांपूर्वी लाँच केली होती. कंपनीने गाडीची किंमत अवघी 54,575 रुपये ठेवली असून तुम्ही ५००० रुपयांच्या डाउनपेमेंट वरून तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.

   

काय आहे ऑफर –

Zelio Eeva या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 54,575 एवढी आहे. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक स्कूटरच्या टॉप व्हेरिएंट ची किंमत 57,475 रुपये एवढी आहे. मात्र तुमच्याकडे सध्या इतके पैसे नसतील तर तुम्ही फक्त 5000 रुपये भरून ही स्कुटर खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला 9.7 टक्के व्याजदराने तीन वर्षांसाठी 1,593 रुपये दर महिन्याला भरावे लागतील. डाउन पेमेंट आणि कर्ज योजनेचा कालावधी हप्त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही जवळच्या डीलरशिपला भेट देऊ शकता.

काय आहेत Zelio Eeva चे फीचर्स-

Zelio Eeva इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये दोन व्हेरियंट मध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात आलेले आहे. या दोन्ही व्हेरियंट मध्ये वेगवेगळे बॅटरी पॅक देण्यात आलेले असून एका स्कूटर व्हेरियंट मध्ये 28Ah 48 V तर दुसऱ्या स्कूटर व्हेरिएंट मध्ये 28 Ah, 60 V बॅटरी दिली आहे. या दोन्ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 5-6 तसंच वेळ लागतो. मात्र एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर तब्बल 120 किलोमीटर पर्यंत रेंज देते. त्याचबरोबर यामध्ये 60 किलोमीटर प्रति तास टॉप स्पीड देण्यात आलेला आहे. त्यामुळे लांब पल्ला गाठताना पण चिंता करण्याची आवश्यकता नाही.

Zelio Eeva या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पॉइंट, डिजिटल ट्रिप मीटर, पुश बटन स्टार्ट, फ्रंट स्टोरेज रिवर्स पार्किंग इन्स्ट्रुमेंट 500 देण्यात आलेले असून या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये फ्रंटला डिस्क ब्रेक तर रियर मध्ये ड्रम ब्रेक वापरण्यात आला आहे.