आता भारतात बनणार Zero Electric Bike; Hero सोबतच्या पार्टनरशिपनंतर कंपनीने केलं जाहीर

टाइम्स मराठी । हिरो मोटोकॉर्प ही भारतातील आघाडीची टू व्हीलर निर्माता कंपनी आहे. आता या कंपनीने अमेरिकेच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल फर्म झिरो मोटरसायकल सोबत पार्टनरशिप केली आहे. त्याचबरोबर हिरो मोटोकॉर्प या कंपनीने कॅलिफोर्निया मध्ये स्थित असलेल्या कंपनीमध्ये सुमारे 490 कोटींची गुंतवणूक केली होती. आणि आता 2023 च्या सुरुवातीलाच झिरो सह इलेक्ट्रिक टू व्हीलर्स वाहन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये झिरो मोटरसायकलचे पोर्टफोलिओ सादर करण्यात येणार असून आता भारतामध्ये झिरो मॉडेल बनवले जाईल.

   

हिरो मोटोकॉर्पने आपल्या वार्षिक रिपोर्टच्या निवेदनात सांगितलं की, भारतीय ग्राहकांना सर्वात उत्तम आंतरराष्ट्रीय क्लीन मोबिलिटी पर्याय मिळावे यासाठी आम्ही झिरो पोर्ट पोलिओ भारतात आणणार आहोत. त्याचबरोबर कॅलिफोर्निया येथील झिरो आता भारतामध्ये त्यांच्या गाड्या बनवेल. त्याचबरोबर या निवेदनात त्यांनी सांगितलं की, पार्टनरशिप नंतर हिरोचे प्लांट, सोर्सिंग, मार्केटिंग आणि डिलिव्हरी क्षमतांसह इलेक्ट्रिक टू व्हीलर तयार करण्यासाठी झिरो च्या कौशल्यांची जोड चांगलीच बसणार आहे. परंतु झिरो मॉडेल मधील नेमकं कोणतं मॉडेल भारतात येणार आहे हे स्पष्ट झालेले नसून झिरो मॉडेल देशात कोणत्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे हे देखील अजून निश्चित नाही. त्याचबरोबर हार्ले डेविडसन प्रमाणे हिरो मोटोकार्प कंपनी झिरो सह हायब्रीड मॉडेल घेतो की नाही हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही.

झिरो कंपनीचे मॉडेल लाईनअप, हे सध्या फक्त स्कॉर्स व्हॅली येथील कंपनीच्या प्लांटमध्ये बनवले जाते. यामध्ये ड्युअल स्पोर्ट्स मॉडेल, एक नेकेड बाईक, एक एडवेंचर टूरर, एक परिपूर्ण फेअर्ड स्पोर्ट बाईक यांचा समावेश आहे. या सर्व बाईक्स 7.2 kwh ते 17.3 kwh बॅटरी पॅक सोबत उपलब्ध आहे. या बाईकची किंमत 13,000 ते 25,000 डॉलर एवढ्या असून भारतीय चलनानुसार 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत आहे