टाइम्स मराठी । सोशल मीडिया वर सतत काही न काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच काही व्हिडीओ हे आश्चर्यचकित करणारे असतात. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये झोमॅटो बॉय ने ड्रोन बनवून ऑर्डर डिलिव्हरी केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतात तरुणांकडे टॅलेंट ची कमी नाही. बरेच जण टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ गाड्या, चार्जिंग वर चालणाऱ्या गाड्या, जुगाडू वस्तू बनवत असतात. आणि या वस्तूच्या माध्यमातून दाखवलेला टॅलेंटला सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवर चालना मिळते. असाच प्रकार समोर आला आहे.
हा तरुण झोमॅटो या कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. वाहतूक कोंडी पाऊस रस्ते, या सर्व गोष्टींमुळे पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी उशीर होतो. वेळेवर पार्सल न पोहोचल्यामुळे मालकाचे आणि ऑर्डर मालकाचे देखील बोलणे खावे लागतात. या सर्व गोष्टींना जुगाड म्हणून त्याने हे स्वतः ड्रोन तयार करायचं ठरवलं. त्यानंतर अभ्यास करून या तरुणाने ड्रोन बनवले. परंतु या ड्रोन ची चाचणी करत असताना त्याला बऱ्याचदा अपयश आले. पण म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर, त्याप्रमाणे प्रयत्न केल्यानंतर शेवटी तरुणाने तयार केलेले ड्रोन यशस्वीरित्या उडू लागले. या तरुणाने ड्रोन बनवून पहिलं पार्सल ग्राहकाच्या घराच्या टेरेसवर दिलं. या ड्रोन च्या माध्यमातून तरुणाने पिझ्झा घरपोच पाठवला.
सोहन नावाच्या या मुलाचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता कि, सोहनला पिझ्झा हटमधून ऑर्डर मिळते आणि तो ताबडतोब एका मोकळ्या जागेत पोहोचतो आणि पिझ्झा डिलिव्हरीसाठी ड्रोनमध्ये लोड करतो. तो ड्रोनद्वारे ग्राहकांच्या टेरेसवर ऑर्डर पोहोचवतो. आणि ग्राहक सुद्धा या अनोख्या डिलिव्हरी मुळे जाम खुश होत आहेत. सोहनचा विश्वास आहे की ड्रोन डिलिव्हरी हे फक्त एक स्वप्न नाही तर एक वास्तव आहे जे लवकरच भारतात सत्यात उतरेल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून या जुगाडाला मोठ्या प्रमाणात युजर्स शेअर करत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे असं लक्षात येतं की, ड्रोन च्या माध्यमातून पार्सल देण्याची टेक्नॉलॉजी आता लवकरच विकसित होऊ शकते. त्यामुळे वेळही वाचेल आणि ट्रॅफिकची कटकट सुद्धा होणार नाही.