मार्केट मध्ये आली आकर्षक Bike; पाहताक्षणीच मनात भरेल

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये बाईक लॉन्च करण्यात येतात. आता Zontes कंपनीने नवीन बाईक नवीन इंजिन सह लॉन्च केली आहे. हिवाळ्याच्या सीजन मध्ये जर तुम्ही फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली ही नवीन बाईक तुमच्यासाठी अप्रतिम ऑप्शन असेल. कंपनीने ही बाईक अतिशय जबरदस्त लुक मध्ये लॉन्च केली आहे. या लॉन्च करण्यात आलेल्या बाईकचे नाव  ZT 703 F आहे. ही एक एडवेंचर टूरिंग बाईक असून यामध्ये अपडेटेड इंजिन वापरण्यात आले आहे. कंपनीने सध्या तरी ही बाइक ग्राहकांसाठी लॉन्च केली नसून पुढच्या वर्षी पर्यंत प्रॉडक्शन रूपात लॉन्च करण्यात येऊ शकते. जाणून घेऊया या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

स्पेसिफिकेशन

Zontes ZT 703 F या बाईक मध्ये कंपनीने 699 cc 3 सिलेंडर इंजिन वापरले आहे. हे इंजिन 7200 RPM वर 85 NM पीक टॉर्क जनरेट करते. आणि 9000 RPM वर 100 HP जनरेट करते. कंपनीने या बाईक सोबतच स्पोर्टीयर  ZT 703 RR मॉडेल देखील सादर केले आहे. यामध्ये देखील  Zontes ZT 703 F प्रमाणेच इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 11000 वर 110 HP पावर आणि 8600 rpm वर  75NM पीक टॉर्क जनरेट करते.

फिचर्स

Zontes ZT 703 F या लॉन्च करण्यात आलेल्या बाईक मध्ये LED लाईट सेटअप सोबतच twin exhaust pipes, crash guard, Pioneer stays,  big windscreen.x  यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. ZONTES बाईक मध्ये कंपनीने 21 इंच आणि 18 इंच चे फ्रंट आणि रियर स्पोक व्हिल्स दिले आहे.