भारताच्या एक दिवस अगोदर पाकिस्तान स्वातंत्र्यदिन का साजरी करतो?

टाइम्स मराठी | 15 ऑगस्ट रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरी करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच, भारतातील २०० वर्षांहून अधिक ब्रिटीश सत्तेचा अंत होय. मुख्य म्हणजे, या 15 ऑगस्ट 1947 रोजीच भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा महत्त्वाचा दिवस. या दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. परंतु तरीदेखील पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. यामागे एक मोठा इतिहास आणि वेगवेगळी कारणे आहेत. आज आपण आजच्या लेखात हीच कारणे जाणून घेणार आहोत.

   

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तरी या सोबतच पाकिस्तान देखील स्वातंत्र्य झाला. आजवर प्रत्येक इतिहासाच्या लेखाजोखात 15 ऑगस्ट तारीख भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिवसाची मुख्य तारीख मांडली जात आहे. असे असताना देखील पाकिस्तान 15 ऑगस्ट ऐवजी 14 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिवस साजरी करतो. या संदर्भातील इतिहास आपल्याला असा सांगतो की, स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशांकडे सत्ता सोपवण्याची जबाबदारी व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र या जबाबदारीचे विभाजन करताना मोठा गोंधळ उडाला. तसेच भारत आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्याच्या वेगवेगळ्या तारखा पडल्या.

लॉर्ड माऊंटबॅटन हे ब्रिटीश सत्तेतील भारताचे शेवटचे आणि एकमेव प्रतिनिधी होते. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडे दोन्ही देशांना सत्ता सोपवण्याची जबाबदारी आल्यामुळे यामध्ये त्यांचा गोंधळ उडाला. त्यांना एकाच वेळी दिल्ली आणि कराचीतही उपस्थित राहणे शक्य नव्हते. तसेच जर त्यांनी त्यावेळी केली असते तर ते गव्हर्नर राहिले नसते. तसेच त्यांच्याकडे सत्ता सोपवण्याचा अधिकार देखील राहिला नसता. यामुळे त्यांनी सर्वात प्रथम पाकिस्तानमध्ये जाऊन सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतला. 13 ऑगस्ट 1947 लॉर्ड माऊंटबॅटन कराचीला गेले होते.

14 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी पाकिस्तानमध्ये संविधान सभेला संबोधित करत सत्ता हस्तांतरित केली. याचवेळी त्यांनी आज रात्री म्हणजेच 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री पाकिस्तान स्वातंत्र्य देशातील अशी घोषणा केली. याचवेळी मोहम्मद जिना यांनीही त्यांच्या भाषणात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून असा उल्लेख केला. तसेच, डॉन वृत्तपत्रानेही 15 ऑगस्ट तारीख आज 15 ऑगस्ट म्हणून लिहिली. परंतु अचानक तारखेमध्ये बदल करत पाकिस्तान सरकारने 14 ऑगस्ट तारीख स्वातंत्र्य दिन म्हणून जाहीर केली. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाकडून 14 ऑगस्ट तारीख स्वातंत्र्य दिन म्हणून जाहीर करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला.

14 ऑगस्टच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असावा याला जिन्ना यांनी देखील विरुद्ध दर्शवला नाही. यानंतर 14 ऑगस्ट 1948 रोजी पाकिस्तानचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरी करण्यात आला. याबाबत अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये वेगवेगळी कारणे देण्यात आली आहेत. असे म्हटले जाते की, पाकिस्तानला भारतासोबत आपला स्वातंत्र्य दिवस साजरी करायचा नव्हता. किंवा भारताच्या बरोबरीने पाकिस्तानला यायचे नव्हते. भारताच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला.

त्याचबरोबर असेही म्हटले जाते की, 14 ऑगस्ट 1947 रोजी रमजानचा 27 वा दिवस होता. याच दिवशी ‘शब-ए-कद्र’ साजरी करण्यात येते. म्हणजेच या दिवशी कुराण पूर्ण झाली होती. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. मात्र कॅलेंडर पाहता त्यादिवशी रमजानचा 27 वा नाही तर 26 वा दिवस होता. अशा इतर अनेक कारणांमुळे पाकिस्तानने 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच आज आज पाकिस्तान मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तर उद्या भारतात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष पाहायला मिळेल.